गुरूवर्य सारेचंं
आपली आई ही आपला पहिला गुरू, मग सर्वप्रथम त्या जननीला वंदन करू. ज्याने बोट धरून चालायला शिकवलं, त्या गूरूवर्य बापालाही माझं नमन पहिलं. अज्ञानी ते ज्ञानी या महामार्गावर घेऊन चालणारा फक्त एक शिक्षक असतो, तोच विद्यार्थ्यांचा गुरू आणि खर्या ज्ञानाचा रक्षक असतो. न बोलता ही खूप काही बोलून जातात, ही पुस्तके ही आपल्याला बरंच काही शिकवून जातात. जे मित्र प्रत्येक संकटात सोबत असतात, तेही आपले आदर्श आणि आपले गुरू असतात. आपला खरा गुरू तर आपला अनुभव ही असतो, जो खर्या अर्थाने आपल्याला आयुष्याचे धडे शिकवतो. खरं तर जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती काही न काही शिकवून जाते, म्हणून काही एक, दोन जणांनाच नाही, तर संपूर्ण जगालाच मी माझा गूरू मानते. -अंकिता घुगे.