मन काय असतं?
मन काय असतं?
एक भावना, एक समज,
की, देवाने दिलेला एक मित्र?
हे तर नक्की माहित नाही,
पण हो.. आपल्या जगण्यात त्याचं महत्त्वाचं असतं पात्र.
दिसत तर कुणालाच नसतं,
तरीही त्याचं ऐकावं लागतं,
त्याच्या एका इशाऱ्यावर
ते संपूर्ण शरीराला कामाला लावतं.
कुणी म्हणतं "आम्ही मनाचे राजे",
तर कुणी म्हणतं "आम्ही मनाचे गुलाम",
आपण कितीही प्रयत्न केला थांबवण्याचा
तरी नाही लागत त्याच्या फिरण्यावर लगाम.
नेहमी सैरभैर भटकत असतं,
विचारांचे पाढे मांडत असतं,
अदृश्य असूनही ते शरीरावर
नेहमीच आपली हुकूमत गाजवत असतं.
पण जी गोष्ट मनाने करायची ठरवली
तर अशक्य ही शक्य होऊन जातं,
त्यासाठी मनाला आपला मित्र बनवावं लागतं
जितकी त्याची मैत्री चांगली तितकंच शत्रुत्व महाग पडतं.
आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची
असेल तर मनाचे राजे व्हा,
चुकून गुलाम बनलात तर
पडेल तुम्हालाच महाग.
असो...,
मन काय असतं? हे तर
नक्की मला माहित नाही,
पण हो... देवाने दिलेली ती एक भेट आहे
जे सुचवते प्रत्येकाला काही न काही.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें