निरोप...२०२० चा
नव्या वर्षाचे आगमन होताच
कित्येक ध्येय मनी ठरली,
आणि ती पूर्ण करण्यासाठी
प्रत्येकाने जणू नवी सुरुवात केली.
परंतु..., कुणास ठाऊक होते, की
सर्व ध्येय अपूर्णच राहणार होती,
आणि वर्षाची सुरुवातच
CORONA सारख्या VIRUS ने होणार होती.
जानेवारीतील मकरसंक्रांतीची
पतंग तर मजेत उडाली,
फेब्रूवारीतील महाशिवरात्रीची
पुजा ही उत्तम झाली.
परंतु, असे काही कानी पडले
जेव्हा आला मार्च महिना,
मृत्युचा धुमाकूळ घालणारा म्हणे एक
VIRUS आला, नाव त्याचे CORONA.
जेव्हा CORONA मुळे LOCKDOWN ची
सुरुवात झाली,
सर्व जग जणू एकाच जागी थांबले,
आणि आज वर्ष पूर्ण होत आले, तरीही
CORONA ने जाण्याचे नाही ठरवले.
२०२० हे वर्ष तर जणू
सर्वांसाठी दुर्दैवच ठरले,
परंतु..., आशा करते, की २०२१
हे वर्ष तरी जाईल चांगले.
जे काही घडले, ते तर बदलता येणार नाही
परंतु, हे सगळं विसरून, चला पुन्हा नव्याने जगूया
आणि २०२० चा निरोप घेऊन
२०२१ चे आनंदाने स्वागत करूया.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें