"CORONA वर थोडेसे"

" आज संपूर्ण जगाचं आयुष्य

मृत्युच्या दारी येऊन ठेपलं,

म्हणूनच तर, "CORONA" वर

थोडसं बोलु म्हटलं."


"का आणि कसा आला तो देशामध्ये

         हेच काही कळेना,

ज्याने घातला मृत्युचा धुमाकूळ

          नाव त्याचे "CORONA."


" 'CHINA' देशामधील 'WUHAN'

          हे त्याचे जन्मठिकाण,

पण त्याने तर हळूहळू

सर्व देशांमध्येच ठोकला मुक्काम."


"CORONA" भारतामध्ये येताच 

मोदीजींनी आपली कंबर कसली,

आणि त्यांच्या निर्णयावरून

'२३ MARCH' पासून 'LOCKDOWN' ला 
                             सुरूवात झाली."


"देशातील तो पहिला दिवस होता

जेव्हा सगळी जनता घरांमध्ये बसली होती,

        कारण '२२ MARCH' या दिवशी

मोदीजींनी 'CURFEW' ची योजना आखली होती."


"संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच

      असे विपरीत घडले,

की, मनुष्याने जगण्यासाठी

चक्क कमवणे सोडले."


"परंतु, असा एक मनुष्य जो या

वातावरणामध्येही पुर्वीसारखेच काम करतो,

त्यालाच आपण जनतेचा अन्नदाताा

     शेतकरी असे म्हणतो."


"या भितीच्या वातावरणामध्येहीज जे जनतेच्या 

रक्षणासाठी करत आहे जोखमीचे काम,

त्या सर्व "DOCTOR'S, NURSES,POLICE

आणि CLEANING WORKERS" ला माझा
                        मनापासून सलाम."


"परंतु, हा छोटासा "CORONA" ही

आपल्याला खूप काही शिकवत आहे,

नेहमी कामात व्यस्त असलेल्या मनुष्याला

आज कुटूंबासोबत बसण्याची फुरसत देत आहे."


"ज्या गरजेच्या गोष्टी असुनही

आपणास कधी ना त्याचे मोल समजले,

त्याच 'MASK' आणि 'SANITIZER' चे महत्त्व

आज "CORONA" ने आपल्याला पटवून दिले."


"आपले हे भाग्य समजावे की,

मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत,

म्हणूनच तर आज बाकी देशांपेक्षा

आपल्या देशातील मृतांची संख्या किमान आहे."


"या छोट्याशा 'VIRUS' ने तर

सर्व देशांची कामेचं ठप्प केली,

कुणाची आर्थिक मंदी वाढली,

तर कुणाची परिक्षाचं रद्द झाली."


"आज "CORONA" चे सावट वेगाने,

तर मृतांची संख्या जोमाने वाढत आहे,

कारण... आपल्यातील एकता

कुठेतरी कमी पडत आहे."


"CORONA" ने तर जणू तिसरे

महायुद्धच सुरू केले आहे,

म्हणूनच तर आज आपल्यासाठी

घरात बसणेचं गरजेचे झाले आहे."


"असे समजा..., जणू देव आपली

       घेत आहे परिक्षा,

म्हणूनच घरातचं बसा, कारण

तुमची सुरक्षा, तीच समाजाची सुरक्षा."

                                           -अंकिता घुगे.
                       
                                    











टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव