"स्त्री-शिक्षणाचा मुलमंत्र"
"स्त्री शिक्षणाचा मुलमंत्र,
पसरु द्या सर्वत्र"
जर घडवी ती दुनियेला
मग का घडवू नये आपण तिला?
विचार करून या गोष्टीचा,
मुलमंत्र जाणा "स्त्री-शिक्षणाचा".
लढे ती स्वाभिमानाने,
कार्य करी आनंदाने,
म्हणून म्हणे सावित्री
नारी घडवा शिक्षणाने.
जर नाते जपते ती मनापासून
मग का दूर ठेवावे तिला यशा-पासून,
विचार करून या गोष्टीचा
मुलमंत्र जाणा "स्त्री-शिक्षणाचा".
सामना करून अन्यायाचा,
चालवी गाडा संसाराचा,
म्हणून म्हणे ज्योतिबा
हक्क द्या तिला शिक्षणाचा.
म्हणे दुनिया साक्षर स्त्री
प्रगत समाज घडविते!
मग या नारीला साक्षर करण्यात
दुनियाच का अडवते?
दु:ख जाणून नारी-जातीचे,
मार्ग करा खुले ज्ञानाचे,
जीवन देऊन मानाचे,
महत्त्व जाणा "स्त्री-शिक्षणाचे".
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें