"होस्टेलचे जीवन"

 पहिल्यांदाच घराबाहेर पडणार या विचाराने 

थोडं घाबरणं,

बाहेरच्या जगाशी कसं वागायचं आणि

कसं जगायचं, या प्रश्नांचं सारखं मनात 

खेळत राहणं,

यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन".


हळूहळू बाहेरच्या जगात वावरण्याची

सवय पडणं,

पण तरीही अधूनमधून आपल्या माणसांची

आठवण येणं,

यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन".


इच्छा नसतानाही मेसचं

जेवण खाणं,

आणि जेवताना अचानक घरच्या अन्नाची

चव आठवणं,

यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन".


बाहेरच्या मुला-मुलींचे विचार पटत नसले, तरीही

ताळमेळ राखणं,

आणि पैसे कमी पडणार नाही ना? याची 

पुर्तता करणं,

यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन".


एकंदरीत, जे जबाबदारी कळण्यासाठी जगावे,

आणि आपल्या माणसांपासून दूर जाण्याच्या 

भितीने न जगावे,

यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन".

                              -अंकिता घुगे.

      



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव