"विचार"

 कधी कधी मनात विचार येतात ना

की, "लोक काय म्हणतील?"

आणि लोकांचे विचार बदलायचे असतील

तर त्या आधी आपल्याला आपल्याच

विचारांमध्ये काही बदल करावे लागतील.


कारण, हे जग जसं असतं ना

आपल्यासाठी ते तसं कधीच नसतं,

खरं तर, जसे आपले विचार असतात ना

तसं हे जग आपल्याला दिसत असतं.


विचारांमध्ये इतकी शक्ती असते

की, त्यामुळे आपलं आयुष्य ही बदलू शकतं,

कारण, जसे आपण विचार करतो ना

त्यानुसार आपलं मन नेहमी बदलत असतं.


विचार करा...! जगामध्ये कितीतरी चहावाले आहेत

परंतु, त्यातील एकच देशाचा "पंतप्रधान" झाला,

कारण, त्या बाकी चहावाल्यांनी

या एकासारखा विचार नाही केला.


नकारात्मक विचार मनात आले

की, मन नेहमी उदास होऊन जातं,

परंतु, जर विचार सकारात्मक असतील ना

तर आयुष्य आपोआपच सुंदर दिसायला लागतं.


मनुष्य शरीराने थकला की,

आराम करतो,

परंतु, मनाने आणि विचाराने थकला की,

आयुष्यच हराम करतो.


आज प्रत्येक मनुष्य ज्या

स्थितीत जगत आहे,

हे त्याने भूतकाळात केलेल्या

विचारांचच फळ आहे.


ध्येयावरून मागे खेचण्यासाठी

नकारात्मक विचार सांगणारे भरपूर असतात,

परंतु, जर ध्येय गाठायचच असेल ना, तर

आपल्याला आपले विचार मात्र सकारात्मक च 

ठेवावे लागतात.


म्हणून, हे तुमच्यावर अवलंबून आहे की,

"लोक काय म्हणतील", याचा विचार करत

आयुष्य व्यर्थ घालवायचं,

की, आपल्या विचारांवर ठाम राहून

सुंदर आणि आनंदी आयुष्य जगायचं.

                                        -अंकिता घुगे.





टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव