"स्वप्नं आणि जबाबदारी"
" लहानपणी कितीतरी स्वप्नं
उराशी बाळगलेली असतात,
पण आई-वडीलांच्या स्वप्नांसाठी
आपली स्वप्नं जरा बाजूलाच ठेवलेली असतात."
"जी स्वप्नं आपण बघितलेली असतात
ती पूर्ण करण्यासाठी शिक्षणाची साथ ही असते बरी,
पण शिक्षण संपल्यानंतर, स्वप्नंही कुठेतरी हरवतात
आणि अंगा-खांद्यावर येते ती जबाबदारी."
"जबाबदारीच्या वाटेवर चालताना
स्वप्नांची वाट कुठेतरी चुकते,
आणि ही वाट पुन्हा जरी शोधाविशी वाटली ना
की, जबाबदारी पुन्हा तीच्या वाटेवर घेऊन येते".
"या छोट्याशा अनुभवातून, एवढं मात्र कळलं
की, स्वप्नं म्हणजे स्वत:ची इच्छा, स्वतःची आवड असते,
आणि आपल्या माणसांची स्वप्नं पूर्ण करणं
हीच आपली जबाबदारी असते."
"म्हणूनच, जबाबदारीचं ओझं कितीही जड असलं
तरी ते उचलावचं लागतं,
आणि स्वप्नं कितीही आनंद देणारी असली
तरीही त्यांना सोडावचं लागतं."
"हो...! पण अशीही माणसं या जगात असतील
की, त्यांनी जबाबदारी पेलुन स्वप्नंही पूर्ण केली असतील,
परंतु, या दोन्ही मार्गांवर चालताना
त्यांनी संकटं ही तितकीच झेलली असतील."
"जर आपल्याला ही जबाबदारी सांभाळून
स्वप्नं खरी करायची असतील,
तर येणाऱ्या प्रत्येक संकटाला न घाबरता लढायला शिका
तरचं लोक आपल्याला कर्तृत्ववान म्हणतील."
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें