..तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!
"नऊ महिने गर्भात वाढवून, असह्य वेदना सहन करून, बाळाला जन्म देणारं फक्त तिचचं उदर आहे
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
"इंग्रजांविरुद्ध आणि आपल्या लोकांसाठी लढणारी ती झाॅंशीची राणी आजही इतिहासात अमर आहे,
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
"कुटुंबासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांशी लढणारी ती एक धारदार तलवार आहे,
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
"मुलींच्या हक्कासाठी लढणारी आणि स्त्री शिक्षणाचं बियाणं पेरणारी ती सावित्री आजही प्रत्येक मुलीच्या नजरेसमोर आहे,
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
"एकाच घरात राहून, दोन्ही घरांच्या सुख समृद्धीवर लक्ष ठेवणारी फक्त तिचीच नजर आहे,
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
"प्रत्येक पुरुषाच्या प्रगतीमागे उभी असणारी ती एक खंबीर आधार आहे,
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
"अन्यायासाठी ती काली आणि घरात आनंद आणणारी ती साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे,
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
"खरं तर कमजोर ती नाही, तिचं सामर्थ्य ओळखू न शकणाऱ्या लोकांची नजर आहे,
आणि तरीही तुम्ही म्हणता स्त्री कमजोर आहे!"
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें