जेव्हा ती येते...

 महिन्याचा प्रवास करून

चार दिवस पाहुणी येते,

माझ्या मनात तर खूप प्रश्न निर्माण होतात

जेव्हा "ती" येते...


आई म्हणते... मंदिरात जाऊ नकोस

तू अशुद्ध आहेस

पण मुळात समाजाचे विचारच

बेशुद्ध पडले आहेत, असे मला वाटते

जेव्हा "ती" येते...


जर "ती" च्या येण्याने एक स्त्री अशुद्ध होते,

आणि जर "ती" च्या अस्तित्वामुळेच एका बाळाला

नवे आयुष्य मिळते,

तर ते बाळ नेमकं शुद्ध की अशुद्ध?

हाच प्रश्न मी आईला विचारते

जेव्हा "ती" येते...


आजी म्हणते... मला हात लावू नकोस

नाहीतर होईल मला शिवपालव,

अहो... शिवपालव वगैरे काही नाही, ही तर फक्त

अर्धवट विचारांची कालवाकालव, असे मला वाटते

जेव्हा "ती" येते...


एकमेकांच्या कानात गुणगुण करण्याऐवजी

मुलगा असो वा मुलगी एखाद्याने तिची मदत

केली तर काय बिघडते,

शाळा किंवा कॉलेज मध्ये असताना अचानक

जेव्हा "ती" येते...


लपवावे लागतात ते कपड्यावरील डाग

जेव्हा Bleeding चे प्रमाण झालेले असते Excess

पण मी म्हणते, पाहणार्यांना माहीत नसते का, की

असते ती एक Natural Body Process;

वाईट ते डाग नाही, वाईट त्या लोकांची नजर असते

जेव्हा "ती" येते...


शाळेत "ती" च्याबद्दल शिकवताना, मुलांना वेगळं बसवतात का?

मग का या गोष्टी पुरूषांपासून लपवाव्यात

असे स्त्रियांना वाटते

जेव्हा "ती" येते...


टिव्हीवर Sanitary Pads ची जाहिरात दाखवताना

कुठे लिहिलेलं असतं का, की पुरूषांनी ही जाहिरात पाहू नये,

मग का पुरूषांकडून Sanitary Pads मागवण्यात

सुद्धा स्त्रियांना एवढी लाज वाटते

जेव्हा "ती" येते...


एखाद्या स्त्री मध्ये "ती" चं अस्तित्व नसल्यास

त्या स्त्रीला अपूर्ण समजलं जातं,

पण ज्या स्त्रियांमध्ये "ती" चं अस्तित्व आहे

तरी का त्यांना ही अशुद्ध म्हटलं जातं?

अशुद्ध ती नाही, लोकांचे विचार आहेत, असे मला वाटते

जेव्हा "ती" येते...


मान्य आहे... आजच्या Educated Youths ला

 "ती" च्याबद्दलचं सर्व Knowledge आहे,

पण तरीही "ती" चा विषय काढताना सुद्धा

आपल्याला लाज वाटते,

पण जर "ती" च्यामुळे एक स्त्री परिपूर्ण होते

तर लाज का वाटावी, असे मला वाटते

जेव्हा "ती" येते...


आजच्या धावपळीच्या जीवनामुळे

एका स्त्रीला खूप सहन करावा लागतो त्रास,

आणि त्या चार दिवसांचा जणू

तिचा सुरू असतो वनवास, असे मला वाटते

जेव्हा "ती" येते...

                                   -अंकिता घुगे.













टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव