चला... स्वतःला शोधूया

 आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला आपण

आपला किमती वेळ देतो,

पण कधी स्वतःला तेवढा वेळ दिला आहे का?

आपण नेहमी दुसर्यां-वरच जास्त प्रेम करतो,

पण कधी स्वतःवर प्रेम करून बघितलं आहे का?


दुसर्यां-वर प्रेम करून काय मिळतं हो...?

शेवटी निराशाच येते ना वाट्याला,

पण कधी तरी स्वतःवर ही प्रेम करून बघा

खरंच सांगते, विसरून जाल तुम्ही या जगाला.


आपण त्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतो

ज्या लोकांना हव्या असतात,

पण आपण त्या गोष्टी कधीच करत नाहीत

ज्या आपल्या मनाला आवडतात.


याचं कारण एकच, "लोक काय म्हणतील"

या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो,

आणि स्वतःला काय आवडतं, हा विचार

मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दाबलेला असतो.


हो... पण अशीही माणसं असतात हं

जी आपलं आयुष्य मनसोक्त जगतात,

कारण, लोकांवर वेळ वाया घालण्याऐवजी

ती माणसं स्वतःला जास्त वेळ देतात.


याचा अर्थ असा नाही, की

स्वार्थी आणि बेफिकीर होऊन जगावं,

हो पण, लोकांच्या गर्दीत न हरवता

कधी तरी मनाचं ही थोडंसं ऐकावं.


जेवढा वेळ तुम्ही स्वतःला द्याल ना

तेवढेच तुम्ही स्वतःला समजू शकाल,

आणि जेवढं प्रेम स्वतःवर कराल ना

तेवढेच तुम्ही आनंदी रहाल.


मग आजपासून एक निश्चय करूया

दिवसातील काही वेळ स्वतःला ही देऊया,

थोडंसं प्रेम स्वतःवर ही करून बघूया

चला तर मग आगोदर स्वतःला शोधूया.

                                        -अंकिता घुगे.


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव