आयुष्याचा प्रवास

 आपलं छोटंसं आयुष्य

मनमोकळं जगायचं असतं,

कितीही आली संकटे तरी

नुसतं रडत बसायचं नसतं.


जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला

एक दिवस हे जग सोडून जायचं असतं,

तरीही... माहित नाही का...? पण

आयुष्य कधी संपूच नये असं नेहमी वाटत असतं.


आयुष्यात खूप नाती जोडली जातात

काही रक्ताची असतात, तर काही मनाची,

काही साथ सोडून जातात, तर काही

आयुष्याच्या सोबतीला असतात ती कायमची.


आयुष्यात सुख-दुःखांच येण-जाणं

हे तर ऊन-सावलीच्या खेळाप्रमाणे शाश्वत असतं,

आणि या खेळात जो जिंकतो ना...

त्यालाच खर्या अर्थाने आयुष्य कळालेलं असतं.


आयुष्याच्या या प्रवासात अनेक प्रश्न

मनात चक्रीवादळासारखी घोंघावत असतात,

काहींची उत्तरे मिळतात खरी, पण

काही प्रश्नांना तर जणू उत्तरेच नसतात.


आयुष्यात नाव आणि ओळख अशी बनवा, की

लोकांना ही लक्षात राहील तुमचा शेवटचा श्वास,

आणि पुढच्या पिढीला ही उद्देशून सांगितला 

जाईल तुमचा "आयुष्याचा प्रवास".

   

                                             -अंकिता घुगे.





टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव