खरं प्रेम
मनापासून केलेलं
ते निष्पाप असतं,
शरीरापेक्षा मनावरचं
हेच खरं प्रेम असतं.
कितीही केल्या चुका
तरी माफ केलं जातं,
एकमेकांना जपणं
हेच खरं प्रेम असतं.
गैरसमज करून
नातं तुटत नसतं,
दोघांनी समजून घेणं
हेच खरं प्रेम असतं.
भांडणं झाल्यावरही
कधी कमी होत नसतं,
समजावून सांगणं
हेच खरं प्रेम असतं.
तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने
कमजोर होत नसतं,
विश्वासाचं असणं
हेच खरं प्रेम असतं.
वादविवाद घालून
सिद्ध करायचं नसतं,
एकमेकांना ऐकणं
हेच खरं प्रेम असतं.
थोडंसं निरागसही
थोडं खोडकळ असतं,
तरी सोबत असणं
हेच खरं प्रेम असतं.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें