माझं स्वप्न
मी स्टेजवर जाताच अचानक
टाळ्यांचा गडगडाट सुरू झाला,
आणि थोड्याच वेळात माझा
बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
दोन शब्द बोलून मी ही
सर्वांचेच आभार मानले,
आणि माझ्या प्रसिद्धीचे सर्व
श्रेय माझ्या मेहनतीलाच दिले.
तिथे जमलेल्यांनी ही माझे
तोंड भरून कौतुक केले,
"अशीच पुढे जात राहा" म्हणून
अनेकांनी आशिर्वाद ही दिले.
माझे हे स्वप्न पूर्ण झालेले बघून
आई-बाबांना ही माझे कौतुक वाटले,
"या प्रसिद्धीची पार्टी पाहिजे हं"
मधेच मित्र-मैत्रिणी ही बोलले.
या प्रसिद्धीच्या आनंदाने
केली आम्ही खूप मजा आणि पार्टी,
एवढ्यात आईचा आवाज कानी आला
"अजून उठली नाही का ही कार्टी".
पटकन जाग आली आणि
चटकन डोळे उघडले,
भानावर आले आणि समजले
जे बघितले मी, असे तर काहीच नाही घडले.
माझ्या काव्यसंग्रहाच्या प्रसिद्धीचा
सजलेला सोहळा होता तो,
जणू काही माझ्या स्वप्नांनी भरलेला
हिरवा मळा होता तो.
आता तोंड पाडून बसलेली मी
काव्यसंग्रहाच्या प्रसिद्धीत मग्न होते,
आणि सकाळी उठल्यावर कळले, की
खरे दृश्य नसून, ते तर फक्त एक स्वप्न होते.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें