आयुष्य जगताना.....
चार-चौघांत बसल्यावर मन मोकळं
करून हसता आलं पाहिजे,
दुःख बाजूला ठेवून त्यांच्यात
मिसळता ही आलं पाहिजे.
कुटूंबासोबत असताना थोडा वेळ का होईना
आपली कामे बाजूला ठेवता आली पाहिजे,
आयुष्यातील काही क्षण तरी
त्यांच्यासोबत घालवता ही आले पाहिजे.
मित्रांसोबत असताना आयुष्यातील खरं सुख
अनुभवता आलं पाहिजे,
तुमच्या आयुष्यात त्याचे स्थान अनमोल आहे
हेही सांगता आलं पाहिजे.
अनोळखी व्यक्तीने जर मदत केली तर
निःसंकोच आभार व्यक्त करता आले पाहिजे,
झाली कधी काही चूक कुणाकडून तर
मन मोठं करून माफ ही करता आलं पाहिजे.
जोडीदार सोबत असताना मन मोकळं
करता आलं पाहिजे,
त्याचा आनंद पाहून आपल्याला ही
दुःख विसरता आलं पाहिजे.
एकटे असताना मनात डोकावून
पाहता आलं पाहिजे,
जगाची पर्वा सोडून फक्त स्वःताला
समजून घेता आलं पाहिजे.
खरं तर... आयुष्य असंच जगता
आलं पाहिजे,
दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण ते Temporary असतं, हेही समजून घेता आलं पाहिजे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें