कष्टाळू बाप
बाप माझा शेतकरी
रात-दिस काम करी,
स्वतः उपाशी राहूनी
लेकराचं पोट भरी.
जसा दिस येई वर
बाप जाई माळावर,
गाई-गुरांच्या सोबती
बाप हिंडे दिसभर.
कर्ज त्याच्या माथ्यावर
काळ बनूनी फिरतया,
तरी मोठ्या आनंदानं
लगीन पोरीचं करतोया.
लेक जाई सासरला
माय रडते लेकीला,
पर, एकटा बैसूनी
बाप रडतो कोपर्याला.
लेकराच्या जीवनाला
जशी ममतेची माया,
तशी गरजेची आहे
प्रेमळ पिताची ही छाया.
बाप माझा शेतकरी
रात-दिस काम करी..........
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें