मुलांचं आयुष्य...

 मुलांचं आयुष्य ही इतकं सोप्पं नसतं,

जबाबदारीचं ओझं त्यांच्या ही खांद्यावर असतं.


जरी त्यांना वंशाचा दिवा म्हटलं जातं,

पण याच दिव्याप्रमाणे त्यांना आयुष्यभर जळावं लागतं.


मुलींना दुःख झालं तर त्या मनमोकळं रडतात,

पण 'आपण रडलो तर यांना कोण सांभाळणार' हा विचार मुलं करतात.


एकेकाळी हा मुलगा आई-वडीलांच्या संसाराचा भाग असतो,

पण बघता बघता एक दिवस याचा ही संसार उभा राहतो.


अगोदर आई-वडिलांची जबाबदारी आणि आता बायको-मुलांची,

मग 'यांचं ही एक वैयक्तिक आयुष्य आहे' याची काळजी कुणी करायची?


मुली आपलं दुःख रडून व्यक्त करतात,

पण कितीही दुःख असलं तरी ही मुलं कधीच व्यक्त होत नसतात.


मुला-बाळांचे लाड पुरवतात, बायकोचे नखरे सांभाळतात,

खरंच, ही मुलं आपल्या कुटुंबासाठी खूप काही करतात.


आपली स्वप्नं विसरून, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं यांना भाग असतं,

खरंच... मुलांचं आयुष्य ही इतकं सोप्पं नसतं.


                                  -अंकिता घुगे. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव