आत्महत्या हा उपाय नाही!!
खरंच इतकं सोप्पं असतं का
स्वतःचं आयुष्य संपवणं,
मग का लोकांच्या मनात येतं
आत्महत्या करणं.
देवाने एकदाच दिलेलं आयुष्य
आनंदात जगता येत नाही?
असेल काही मनात तर
आपल्या माणसांना सांगता येत नाही?
मनातील गोष्टी सांगता येत नसतील
तर थेट कोर्या कागदावर लिहून टाका,
परंतु, आत्महत्या करण्याचा विचार
कृपया कुणी ही मनात आणू नका.
मन नेहमी रिकामं असू द्या
त्यावर शब्दांचा भार देऊ नका,
स्वतःचा नाही, निदान घरच्यांचा विचार करून
तरी हे आत्महत्येचे विष पिऊ नका.
तुम्ही तर देवाघरी जाऊन
निवांत व्हाल हो.. पण घरच्यांच काय?
तुमच्या मागे त्यांनी कुणाकडे पाहायचं
आणि कुणाचे धरायचे पाय.
बलात्कार, कर्ज, प्रेम विरह, डिप्रेशन
अशी आत्महत्येची कारणं वेगवेगळी,
परंतु, तुमच्या आत्महत्येचं खरं कारण तुम्हालाच माहीत असतं
बाकी तर अफवा पसरवतात ही माणसं सगळी.
कारण कोणतेही असो, परंतु
आत्महत्या करणं हा त्यावरील उपाय नाही,
फक्त आयुष्याशी लढण्याची हिंमत ठेवा
मग बघा तुमच्यासोबत काहीही अपाय घडणार नाही.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें