सुनी घरटीं...

 रात सरली, तशी पिल्ले जागी झाली,

पिल्लांची माय आता दाणा आणाया निघाली,


पिल्लांचा चिवचिवाट असा सुरू झाला,

जणू पिल्ले मायेविना कधी न राहिली,


सुर्य डोक्यावर आला, पण माय अजून येईना,

माय चुकली तर नाही ना? पिल्ले ही विचारात पडली,


मायेला आपली काळजी कशी बरं वाटेना?

घरट्यात पिल्लांना एकटं सोडून, माय कुठे बिनघोर झाली,


सुर्य मावळला, पण माय काही परतेना,

पिल्ले ही मायेच्या आठवणीत आता व्याकूळ होऊ लागली,


खरं तर, पिल्लांची माय आता कधीच परतणार नव्हती,

विजेच्या तारेला चिकटून तिची जीवनयात्रा केंव्हाच संपली!!


ही कहानी केवळ या एकाच घरट्याची नाही,

अशी कित्येक घरटीं मायेविना अशीच सुनी झाली!!

                                  -अंकिता घुगे.



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव