अनुभव-एक शस्त्र

 जन्माला आल्या आल्या

कोणी हुशार होत नाही,

आईच्या पोटातूनच कोणी

आयुष्याचे धडे शिकून येत नाही.


आपण जसे मोठे होत जातो

तसं सगळंच हळूहळू कळायला लागतं,

वाढत जातात अपेक्षा ही आणि

हळूहळू छोटंसं जग मोठं वाटायला लागतं.


तुम्ही कितीही ज्ञानी असलात

तरीही अनुभवाशिवाय कुठेतरी आयुष्यात कमी पडाल,

पण ज्ञानाला जर अनुभवाची जोड असेल

तर आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल.


अनुभवातून आयुष्याचा खरा अर्थ कळतो

अनुभवातून माणसं ही ओळखता येतात,

अनुभव एक असं शस्त्र आहे

ज्याच्या घावाने दुसऱ्याच्या मनावरील घाव ही कळतात.


अनुभव जितके वाढतील ना

तितकंच आयुष्याचं कोडं ही सुटत जाईल,

या अनुभवासारख्या शस्त्रामुळे 

अडचणींचा विळखा ही हळूहळू तुटत जाईल.


                              -अंकिता घुगे.






टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव