सुख नेमकं कशात असतं?
कुणाचं कशात तर कुणाचं कशात असतं,
हे सुख नेमकं कशात असतं.
"मला इतकंच का मिळालं"
हे सुख असतं?
की, "मला इतकं मिळालं!"
हे सुख असतं?
कुणाचं दुसऱ्यांच्या सुखातच सुख असतं,
तर कुणी स्वतःला खुश ठेवण्यातच खरं सुख मानतं.
कुणाचं सुख पैशाने विकत मिळतं,
तर कुणाचं प्रेमाच्या दोन शब्दांतच आयुष्यभराच सुख असतं.
कुणी दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या प्रेमात सुख शोधतं,
तर कुणाला स्वतःवर प्रेम करून सुख मिळतं.
कुणाला दुसऱ्यांसाठी जगून खरं सुख अनुभवता येतं,
तर कुणी "स्वतःसाठी जगणं हेच खरं सुख" असं म्हणतं.
या सगळ्या गोष्टींवरून एक मात्र नक्की कळतं,
कुणाचं सुख कशात तर कुणाचं कशात,
हे ज्याच्या त्याच्या विचारांवर निर्भर असतं.
तरीही सुखाची व्याख्या जर शोधली, तर एकचं उत्तर मिळतं,
की, खरं सुख हे फक्त समाधानी असण्यातच असतं.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें