देवाने दिलेली शिदोरी-कुटुंब
कुटुंबच आपली ओळख आणि कुटुंबच आपले प्रतिबिंब, देवाने दिलेली एक अनमोल शिदोरी म्हणजेच कुटुंब. कुटुंबच आपली ताकद आणि कुटुंबच आपली शक्ती, खूप काही शिकवून जातात ही कुटुंबातील नाती. कुटुंबच आपला आधार आणि कुटुंबच आपला किनारा, जिथं जग साथ सोडतं, तिथं कुटुंबच आपला सहारा. कुटुंबच आपली शान आणि कुटुंबच आपला मान, जिथं कुटुंब असते सोबत, तिथंच आपला सम्मान. कुटुंबच आपली इज्जत आणि कुटुंबच आपली संपत्ती, असेल सोबत कुटुंब, तर येणार नाही कुठलीही आपत्ती. कुटुंबच आपली आशा आणि कुटुंबच आपली खुशी, सोबत असतंच नेहमी, मग परिस्थिती असो कशी. कुटुंबच आपली आशा आणि कुटुंबच आपली अपेक्षा, नसावं कुणी इतकं महत्त्वाचं आयुष्यात कुटुंबापेक्षा. कुटुंबच आपला आदर आणि कुटुंबच आपली हिंमत, नसेल कुटुंब सोबत, तर नाही आपल्याला ही काही किंमत. कुटुंबच आपलं जग आणि कुटुंबच आपलं सर्वस्व, जर साथ असेल कुटुंबाची, तर जगावर आपलं वर्चस्व. कुटुंबच आपलं जीवन आणि कुटुंबच आपलं आयुष्य, कुटुंबाच्या अनमोल मार्गदर्शनानेच तर घडतं आपलं उद्याचं भविष्य. ...