"मायबोली मराठी"
"माझ्या मराठी मातीचा ललाटी टिळा असू द्या, वाढले जरी परकीय भाषेचे साम्राज्य पण मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." " 'मी मराठी' म्हणून अभिमान असू द्या, मराठी न्यूनतेचा मनामध्ये तळतळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "म्हणे शिवबा, माझ्या मराठीचा गंध जगभर पसरू द्या, टिळक म्हणती, प्रत्येकाच्या मनी माझ्या मराठीचाच झळझळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "सह्याद्रीच्या दर्या-खोर्यांतून मराठीचा वाहणारा वारा असू द्या, मराठी स्वप्नांचा सदैव फुलणारा हिरवा मळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "परकीय भाषेचे देशामध्ये कितीही साम्राज्य असू द्या, मात्र, मराठीचा सूर प्रत्येकाच्या गळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "जरि 'परिवर्तन हा निसर्गाचा नियम असू द्या, परंतु, 'जूने ते सोने असते, हा विचारही लक्षात असू द्या. मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." ...