संदेश

जनवरी, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

शायरी

 "अगर दिल में कुछ है तो किसी से share जरुर करना, क्योंकी, solution मिले ना मिले,  लेकिन दिल खोलकर सुकून    बहोत मिलेगा|"☺️                                           -अंकिता घुगे.*

"विचार"

 कधी कधी मनात विचार येतात ना की, "लोक काय म्हणतील?" आणि लोकांचे विचार बदलायचे असतील तर त्या आधी आपल्याला आपल्याच विचारांमध्ये काही बदल करावे लागतील. कारण, हे जग जसं असतं ना आपल्यासाठी ते तसं कधीच नसतं, खरं तर, जसे आपले विचार असतात ना तसं हे जग आपल्याला दिसत असतं. विचारांमध्ये इतकी शक्ती असते की, त्यामुळे आपलं आयुष्य ही बदलू शकतं, कारण, जसे आपण विचार करतो ना त्यानुसार आपलं मन नेहमी बदलत असतं. विचार करा...! जगामध्ये कितीतरी चहावाले आहेत परंतु, त्यातील एकच देशाचा "पंतप्रधान" झाला, कारण, त्या बाकी चहावाल्यांनी या एकासारखा विचार नाही केला. नकारात्मक विचार मनात आले की, मन नेहमी उदास होऊन जातं, परंतु, जर विचार सकारात्मक असतील ना तर आयुष्य आपोआपच सुंदर दिसायला लागतं. मनुष्य शरीराने थकला की, आराम करतो, परंतु, मनाने आणि विचाराने थकला की, आयुष्यच हराम करतो. आज प्रत्येक मनुष्य ज्या स्थितीत जगत आहे, हे त्याने भूतकाळात केलेल्या विचारांचच फळ आहे. ध्येयावरून मागे खेचण्यासाठी नकारात्मक विचार सांगणारे भरपूर असतात, परंतु, जर ध्येय गाठायचच असेल ना, तर आपल्याला आपले विचार मात्र सकारात्म...

शायरी

 "जिंदगी भले ही अकेले की हो अपनों को साथ लेकर चलना पड़ता हैं, क्योंकि अगर अपनो का साथ छुॅंट जाए  तो अकेले जिंदगी भी कौन जीता हैं?"🥰🥰                                         -अंकिता घुगे.          

शायरी

 "कभी ये सोच कर दुखी मत होना, कि कब ये जमाना मेरे हुनर को समझ पाएगा, क्योंकि, अगर हिरे की पहचान हर कोई करने लगा तो उसका मोल कम नहीं हो जाएगा?"😊☺️                                       -अंकिता घुगे.      

"स्वप्नं आणि जबाबदारी"

" लहानपणी कितीतरी स्वप्नं उराशी बाळगलेली असतात, पण आई-वडीलांच्या स्वप्नांसाठी आपली स्वप्नं जरा बाजूलाच ठेवलेली असतात." "जी  स्वप्नं आपण बघितलेली असतात ती पूर्ण करण्यासाठी शिक्षणाची साथ ही असते बरी, पण शिक्षण संपल्यानंतर, स्वप्नंही कुठेतरी हरवतात आणि अंगा-खांद्यावर येते ती जबाबदारी ." "जबाबदारीच्या वाटेवर चालताना स्वप्नांची वाट कुठेतरी चुकते, आणि ही वाट पुन्हा जरी शोधाविशी वाटली ना की, जबाबदारी पुन्हा तीच्या वाटेवर घेऊन येते". "या छोट्याशा अनुभवातून, एवढं मात्र कळलं की, स्वप्नं म्हणजे स्वत:ची इच्छा, स्वतःची आवड असते, आणि आपल्या माणसांची स्वप्नं पूर्ण करणं हीच आपली जबाबदारी असते." "म्हणूनच, जबाबदारीचं ओझं कितीही जड असलं तरी ते उचलावचं लागतं, आणि स्वप्नं कितीही आनंद देणारी असली तरीही त्यांना सोडावचं लागतं." "हो...! पण अशीही माणसं या जगात असतील की, त्यांनी जबाबदारी   पेलुन स्वप्नंही पूर्ण केली असतील, परंतु, या दोन्ही मार्गांवर चालताना त्यांनी संकटं ही तितकीच झेलली असतील." "जर आपल्याला ही जबाबदारी सांभाळून स्वप्नं खरी ...

"होस्टेलचे जीवन"

 पहिल्यांदाच घराबाहेर पडणार या विचाराने  थोडं घाबरणं, बाहेरच्या जगाशी कसं वागायचं आणि कसं जगायचं, या प्रश्नांचं सारखं मनात  खेळत राहणं, यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन" . हळूहळू बाहेरच्या जगात वावरण्याची सवय पडणं, पण तरीही अधूनमधून आपल्या माणसांची आठवण येणं, यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन" . इच्छा नसतानाही मेसचं जेवण खाणं, आणि जेवताना अचानक घरच्या अन्नाची चव आठवणं, यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन" . बाहेरच्या मुला-मुलींचे विचार पटत नसले, तरीही ताळमेळ राखणं, आणि पैसे कमी पडणार नाही ना? याची  पुर्तता करणं, यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन" . एकंदरीत, जे जबाबदारी कळण्यासाठी जगावे, आणि आपल्या माणसांपासून दूर जाण्याच्या  भितीने न जगावे, यालाच म्हणतात "होस्टेलचे जीवन" .                               -अंकिता घुगे .       

😥हरवली पाखरे!😥

 ज्या लहानग्यांना अजून श्वास घेणे ही नीट आले नव्हते, त्यांचाच श्वास हिरावून घेताना देवाला काहीच वाटले नव्हते? ज्या चिमुकल्यांनी हाताची मुठ ही उघडली नव्हती अजून, त्यांचे इतक्या लवकरच गेले डोळे मिटून! ज्या नवजात बालकांनी अजून आयुष्याची सुरुवात ही केली नव्हती, त्यांचेच आयुष्य हिरावून घ्यायला देवाला काय बरं एवढी घाई झाली होती? त्या आई-वडीलांनी आपल्या चिमुकल्यांसाठी कितीतरी स्वप्नं बघितली असतील, परंतु, त्या ICU मध्ये लागलेल्या आगीत त्यांना आपली सर्व स्वप्नं राख होताना दिसत असतील. हे देवा..., आता फक्त एवढंच काम कर,  त्यांचे प्राण तर घेऊन गेलास, पण त्या चिमुकल्यांच्या आत्म्यांना शांती मात्र प्रदान कर.                                       -अंकिता घुगे. .

"स्त्री-शिक्षणाचा मुलमंत्र"

 "स्त्री शिक्षणाचा मुलमंत्र, पसरु द्या सर्वत्र" जर घडवी ती दुनियेला मग का घडवू नये आपण तिला? विचार करून या गोष्टीचा, मुलमंत्र जाणा "स्त्री-शिक्षणाचा". लढे ती स्वाभिमानाने, कार्य करी आनंदाने, म्हणून म्हणे सावित्री नारी घडवा शिक्षणाने. जर नाते जपते ती मनापासून मग का दूर ठेवावे तिला यशा-पासून, विचार करून या गोष्टीचा मुलमंत्र जाणा "स्त्री-शिक्षणाचा". सामना करून अन्यायाचा, चालवी गाडा संसाराचा, म्हणून म्हणे ज्योतिबा हक्क द्या तिला शिक्षणाचा. म्हणे दुनिया साक्षर स्त्री प्रगत समाज घडविते! मग या नारीला साक्षर करण्यात दुनियाच का अडवते? दु:ख जाणून नारी-जातीचे, मार्ग करा खुले ज्ञानाचे, जीवन देऊन मानाचे, महत्त्व जाणा "स्त्री-शिक्षणाचे".                                                                                                     -अंकिता घ...