जात-पात, धर्म-अधर्म यावरच किती राजकारण चाललंय आज, परंतु, समतेची जात आणि माणुसकीचा धर्म एवढंच लक्षात असू द्या ना सोडा तो जातीचा व्यर्थ माज. म्हणतात की, राम-रहीम एकच आहेत आणि आता मलाही कुठेतरी हे पटू लागलं होतं, परंतु, हा भ्रम ही तेव्हा दूर झाला जेव्हा आपापल्या जातीनुसार आपण देवालाही वाटून घेतलं होतं. दुर्गा आणि दर्गा यांत फारसा फरक नाही तरीही दुर्गेचा रंग लाल आणि दर्गेचा रंग हिरवा असं म्हणतात, परंतु, हे विसरून कसं चालेल, की दर्गेवरही लाल रंगाची चादर चढवतात आणि दुर्गेलाही हिरव्या चोळी-पातळानेच सजवतात. गीता असो, कुराण असो वा बायबल तीनही ग्रंथांमध्ये असे तो संदेश माणुसकीचा, नाही उल्लेख विशिष्ट जाती-धर्माचा कुठे तरीही का रचलाय बाजार आपण जातीव्यवस्थेचा. स्वतंत्र दिन असो वा प्रजासत्ताक दिन या दिवशी "आम्ही भारतीय" म्हणून तर जणू आसमान दाटते, परंतु, येताच बात आरक्षणाची... आता मात्र सर्वांनाच आपापली जात आठवते. देवाने घडवला फक्त तो माणूस जातीव्यवस्था घडवण्याचा विचार कधी त्याने केला नाही, भारतात होऊन गेलेले विचारवंत ही त्यातीलच एक समाजसेवा करताना त्यांनी ही कधी जाती-धर्माचे बहाने सांगित...